मुंबईतील १३/७चा संबंध लादेनशी?

मुंबईवरील १३/७ च्या बाँम्बहल्ल्यातील सहभागी आरोपी हारून रशीद अब्दुल हमीज नाईक यांने कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन याची भेट घेऊन हल्लाचा कट केला होता, असा दावा महाराष्ट्रातील एसटीएसच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

Updated: Feb 8, 2012, 11:05 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबईवरील १३/७ च्या बाँम्बहल्ल्यातील सहभागी आरोपी हारून रशीद अब्दुल हमीज नाईक यांने कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन याची भेट घेऊन हल्लाचा कट केला होता, असा दावा महाराष्ट्रातील एसटीएसच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

 

 

हारून यांने पाकिस्तानात जाऊन लादेशची भेट घेतली. तो ४० दिवस पाकिस्तानात होता. त्यांने हल्ल्याचे प्रशिक्षण घेतले होते. तो अल-कायदा या दहशतवादीच्या प्रशिक्षण शिबिरातही सहभागी झाला होता. तसेत १३/७ च्याहल्ल्यातील मास्टर माईंड लखवी यांच्याशी चर्चा झाली होती. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट होत असल्याचे एटीएसने म्हटले आहे. मात्र, या हल्ल्याचा पाकने इन्कार केल्याचे म्हटले आहे. पाकने जरी इन्कार केला तरी दहशतवादाला सीमेपलिकेडून म्हणजेच पाकचा खतपाणी घातले गेले आहे, याला आता दुजोरा मिळत असल्याचे एटीएसने म्हटले आहे.

 

 

याआधी ३ फेब्रुवारीला मुंबई हल्ल्यामागे इंडियन मुजाहिदीन (आईएम)च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. इंडियन मुजाहिदीन कार्यकर्त्यांना पाकिस्तानात लष्कर-ए-तय्यबाच्या प्रशिक्षण शिबिरात ट्रेनिंग दिले गेले असल्याचे म्हटले होते. या अहवालानंतर मुंबई हल्लाप्रकरणी हारून नाईक याला अटक केली आहे. त्यांने सांगितल्यानुसार आईएमचा संस्थापक यासीन भटकळ य़ाच्याबरोबर दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले आहे. तो या अतिरेकी संघटनेचा महत्वपूर्ण सदस्य होता. तो अफगानिस्तानमध्ये अल-कायदाबरोबर जिहादसाठी शत्रुंशी लढा दिला होता. तसेच पकडण्यात आलेल्या संदेशातून ही बाबही स्पष्ट झाली आहे

 

 

या ३५ वर्षीय हारून नाईकला याआधी नकली नोटाप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पकडण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दिली आहे.

 

[jwplayer mediaid="43831"]