मुंबई : आपण जिथं जातो तिथं आपली सावली आपल्या मागे मागे येते... काहीही झालं तरी आपली साथ सोडत नाही. मात्र, आज दुपारी आपली सावली हरवणार आहे.
नेमकी का हरवते सावली?
पृथ्वीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीमुळे हे बदल काही क्षणासाठी होतात. पृथ्वी ज्या पातळीवरुन सूर्याची परिक्रमा करते त्या पातळीला पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. वर्षभरात पृथ्वीच्या अक्षांशांवर सूर्यकिरणे क्रमाक्रमाने वेगवेगळ्या दिवशी लंब प़डतात. त्या अक्षांशांवरच्या लोकांना जवळपास मिनिटभर सावली गायब झाल्याचा अनुभव येतो.
वर्षातून दोनदा हा भौगोलिक बदल जाणवतो. अगदी आपल्या पायाशी आलेली सावली क्षणात नाहीशी होते.. मुंबई आणि पुणेकरांसह आगामी दोन ते तीन दिवसांत अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक आणि जालना इथंही झिरो शॅडो डे अनुभवता येणार आहे.
इथं घ्या अनुभव 'झीरो शॅडो डे'चा!
मुंबई आणि पुणेकरांना आज दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी काही क्षणासाठी सावली हरवल्याचा अनुभव येणार आहे.
अहमनदनगरमध्ये दोन दिवस हा म्हणजेच १६ मे आणि १७ मे रोजी दुपारी १२.२७ वाजता हा क्षण अनुभवता येईल.
औरंगाबादमध्ये १९ मे आणि २० मे रोजी दुपारी १२.१५ वाजता हा अनुभव घेता येईल.
तर, नाशिककरांना २० आणि २१ मे रोजी दुपारी १२.३१ वाजता हा अनुभव घेता येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.