झी मीडियाचा दणका, शिप्रच्या चौकशीचे आदेश

 झी मीडियाच्या दणक्यानंतर अखेर शिक्षण प्रसारक मंडळीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिलेत…

Updated: May 30, 2015, 07:31 PM IST
झी मीडियाचा दणका, शिप्रच्या चौकशीचे आदेश title=

पुणे :  झी मीडियाच्या दणक्यानंतर अखेर शिक्षण प्रसारक मंडळीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिलेत…

झी मिडियानं उजेडात आणलेला भ्रष्टाचार आणि त्याचा सातत्यानं केलेला पाठपुरावा याची दखल धर्मदाय आयुक्तांनी घेतलीये...

शिक्षण प्रसारक मंडळी आणि संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराची वृत्त प्रसारित होत आहेत. त्यातील सत्यता पडताळून पाहणे हे न्यासाचा रक्षणकर्ता म्हणून आपलं कर्तव्य असल्याच धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी नोटीशीमध्ये म्हटलंय.

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास संचालक मंडळ सदस्यांना निलंबित केलं जाऊ शकतं आणि आर्थिक नुकसानीसाठी रक्कमही त्यांच्याकडून वसूल केली जावू शकते, असं धर्मदाय आयुक्तांनी स्पष्ट केलंय...

धर्मदाय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता  तरी सरकारला जाग येणार का? या महाघोटाळ्याच्या चौकशीचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे देणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.