शिवसेना शाखाप्रमुखाला अरुण गवळी गँगच्या नावाने धमकी

येथील शिवसेना शाखाप्रमुख आणि  बांधकाम व्यावसायीक अनिल कुंचे याला खंडणी प्रकरणी अरुण गवळी गँगच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. एका दुकानाच्या व्यवहाराप्रकरणी कुंचेकडून ६० लाखांची खंडणी मागण्यात आली.

Updated: May 30, 2015, 04:07 PM IST
शिवसेना शाखाप्रमुखाला अरुण गवळी गँगच्या नावाने धमकी title=

उल्हासनगर : येथील शिवसेना शाखाप्रमुख आणि  बांधकाम व्यावसायीक अनिल कुंचे याला खंडणी प्रकरणी अरुण गवळी गँगच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. एका दुकानाच्या व्यवहाराप्रकरणी कुंचेकडून ६० लाखांची खंडणी मागण्यात आली.

कुंचेला शस्त्राचा धाक दाखवून भायखळा येथील दगडीचाळीत नेण्यात आलं. या प्रकरणी चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुंचे हे उल्हासनगर कँम्प पाच येथील गायकवाड पाडा येथे रहात असून ते शिवसेना शाखाप्रमुख आहेत. 

अनिल कुंचे ऊर्फ लाल्या याची उल्हासनगर गाऊन बाजार येथे काही दुकान असून त्यात कनोजिया नावाचं परिवार राहतं, ते रूम खाली करत नसल्याने अनिल कुंचे आणि त्यांच्या वाद सुरू आहे. त्यात गेल्या महिन्यात राम वाधवा, नंदू वाधवा आले आणि त्यांनी अरुण गवळीच्या नावाने त्याला धमकाविण्यास सुरुवात केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.