विशाल वैद्य, कल्याण : कल्याण च्या रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या स्कायवॉक ची भयानक अवस्था झी २४ तास न समोर आणल्यानंतर कल्याण चे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
शिंदे यांनी स्कायवॉक प्रश्नी रेल्वे ,आरपीएफ आणि महापालिका त्यांची तात्काळ बैठक घेत महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशंसनाला चांगलेच धारेवर धरले..या तिन्ही विभागाची संयुक्त कृती समिती तयार करून स्कायवॉक फेरीवाला आणि कचरा मुक्त करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत..
कल्याणचा स्कायवॉक एक गंभीर समस्या बनला आहे..हा स्कायवॉल्क रेल्वेस्थानकातून ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बनवलाय असा समज असेल तर तो चुकीचा असून स्कायवॉल्क हा केवळ अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या रोजगाराचा प्रश्न कायम स्वरूपी मिटावा यासाठीच केला आहे अशी शंका येते..कारण वर्षानुवर्षे हे फेरीवाले येथे ठाण मांडूनच आहेत..
कधी तरी प्रशासनाला हुक्की येते आणि स्कायवॉल्क मोकळा केला जातो मात्र अधिकारी आणि कर्मचारी यांची पाठ फिरली कि लगेच पुन्हा फेरीवाले स्कायवॉल्क वर आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे हजर..त्यातही हे फेरीवाले इतके मुजोर कि एक तर अनधिकृत धंदा करतातच आणि वर सव परिसर घाण करून ठेवतात..कोट्यवधी रुपये खर्च करून हा स्कायवॉल्क बांधलं असला तरी त्याचा सामान्य प्रवाशांना काहीच उपयोग होत नसतो..
आता तर या स्कायवॉल्क वर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेलं दिसून येतात..त्यातून नाक मुठीत घेऊन कसेबसे प्रवाशी ये जा करतात.झी २४ तास न या स्कायवॉक च्या दुरावस्थेत वृत्त दाखवताच प्रशासन ढिम्म असाल तरी कल्याण चे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ दखल घेत या विषयावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे ,आरपीएफ आणि महापालिका त्यांची तात्काळ बैठक घेत महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशंसनाला चांगलेच धारेवर धरले..या तिन्ही विभागाची संयुक्त कृती समिती तयार करून स्कायवॉक फेरीवाला आणि कचरा मुक्त करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत..
खासदारांनी बोलावलेल्या या बैठकीत रेल्वे आणि महापालिका एकमेकांवर दोष देताना दिसत होते..आरपीएफ ने आमच्या हद्दीत फेरीवाले आम्ही बसूच देत नाही असा दावा करत महापालिकेला कारवाईसाठी मदत करण्याचं आश्वासन दिल..तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी झी 24 तास ने हे वृत्त दाखवल्या ब द्दल आभार व्यक्त केले..मात्र त्यांनी सुद्धा आरपीफ लाच जबाबदार धरत संयुक्त कारवाई करत फेरीवाला मुक्त करू असं आश्वासन दिल..
आता महापौर साहेब नुसते मीडियाचे अभार मानत धन्यता मानतात कि प्रत्यक्षात आक्रमक भूमिका घेत स्कायवॉक ची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घेतात याकडे झी २४ तास लक्ष ठेऊन असणार आहे. कारण फेरीवाले बसतात तो भाग हा महापालिका हद्दीतच येतो त्यामुळे आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून महापालिकेला गप्प बसता येणार नाही. अन्यथा स्कायवॉक फेरीवाला युक्त होण्यासाठी अधिकारी आणि राजकारणी लाखो रुपयांचे हप्ते घेतात हा आरोप खरंच मानावा लागेल...