ठाणे : विवियाना मॉलमध्ये 4 युवकांनी दारू पिऊन एका दुकानामध्य़े सुरक्षा रक्षकासोबत हाणामारी केली. किरकोळ वादानंतर तुफान तोडफोड करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार जवळपास अर्धा तास विवियाना मॉलमध्ये सुरु होता.
हजारो लोक या मॉल मध्ये असताना दारू प्यायल्यानंतर झालेल्या या प्रकरणानंतर युवकांनी आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले, आणि तुंबळ हाणामारी केली.
या प्रकारामुळे मॉल मधील सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे, याआधी सुद्धा या मॉल मध्ये एका युवतीवर बलात्काराचा प्रकार घडला आहे. मॉलमध्ये वर्तक नगर पोलीस आल्यावर काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.