नाशिक : नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. तीन मजली इमारतीच्या छतावरुन या तरुणाने खाली उडी घेतली.
दिलीप भुसारे असे या २१ वर्षीय तरुणाचे नाव आहे. या घटनेत दिलीप जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दिलीपचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दिलीप आणि त्याची प्रेयसी घरातून पळून गेले होते. त्यानंतर दिलीपच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र गुरुवारी दिलीप आणि त्याची प्रेयसी पोलिसांना शरण आले. यावेळी दोघांनाही समजावण्यात आले.
पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवण्यासाठी तिला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नेले. यादरम्यान प्रेयसीला पोलीस ताब्यात घेत असल्याचे दिलीपला वाटले. या गैरसमजातून त्याने थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली.