ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथं एका आईनंच आपल्या दीड वर्षांच्या मुलाची क्रूर पद्धतीनं हत्या केली.
दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी परिसरात असलेल्या वैभव इमारतीमध्ये ही घटना घडलीय. आजारपणाला कंटाळून आईनं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.
बुधवारी, रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडलीय. संबंधित महिलेनं आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या मुलाची हत्या केली. आपल्या मोठ्या मुलाच्या मानेवरही तिनं गंभीर वार केले. यात मुलगा जखमी झालाय.
यानंतर या महिलेनं स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचाही प्रयत्न केला.
दरम्यान, महिलेवर आणि तिच्या मोठ्या मुलावर छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.