वृद्धाश्रमाचे उद्घाटन, ५ महिन्यापासून वृद्ध बाहेर बाकड्यावर

तुर्भेतील ८२ वर्षीय शिवाजी गोपाळ थिटे सध्या एका वृद्धाश्रमाच्या बाहेर एका बाकड्यावर बेवारसाचं जीवन जगत आहे. गेल्या पाच महिन्यापासून थिटेंना एक एक दिवस हाल-अपेष्टांमध्ये काढावे लागत आहे. 

Updated: Aug 18, 2015, 10:08 PM IST
वृद्धाश्रमाचे उद्घाटन, ५ महिन्यापासून वृद्ध बाहेर बाकड्यावर title=
Pics: Deepak Singh

तुर्भे : तुर्भेतील ८२ वर्षीय शिवाजी गोपाळ थिटे सध्या एका वृद्धाश्रमाच्या बाहेर एका बाकड्यावर बेवारसाचं जीवन जगत आहे. गेल्या पाच महिन्यापासून थिटेंना एक एक दिवस हाल-अपेष्टांमध्ये काढावे लागत आहे. 

शिवाजी थिटे गेल्या १२ वर्षांपासून वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रम कधी महानगरपालिका बांधताहेत याची वाट पाहत आहेत. माझ्या मुलांनी मला घराबाहेर काढलं. मला चांगली वागणूक देत नव्हते. मला वाटलं की महापालिकेने माझ्या सारख्या लोकांसाठी एखादं वृद्धाश्रम बांधावं, असे शिवाजी थिटे यांनी आयएमइन डीएनशी बोलताना सांगितले. 

नवी मुंबई महापालिकेने गेल्या मार्च महिन्यात वृद्धाश्रमही बांधलं. नवी मुंबई वाहतूक कार्यालयाच्या समोरच्या बागेत हे वृद्धाश्रम बांधले. या वृद्धाश्रमाचं उद्घाटनही झालं पण २४ तासात ते बंद करण्यात आल्याचा आरोप शिवाजी थिटेंनी केला. 

त्यांना मी सांगितलं की मला वृद्धाश्रमात राहू द्या. पण हे वृद्धाश्रम सुरू नाही असे सांगून त्यांनी मला त्यात राहण्यास बंदी केली. त्यामुळे, मला कुठेही जाण्यास जागा नसल्याने या वृद्धाश्रमाच्या बाहेर मी गेल्या पाच महिन्यांपासून राहत आहे. 

शिवाजी थिटे त्या बाकावर राहतात आणि समोरच्या देवळात मिळेल ते खाऊन गुजराण करतात.  शिवाजी थिटे सांगतात की, नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी जेव्हा वृद्धाश्रमाचा दरवाजा उघतात आणि त्यात झोपायला जातात. पण मला आत येऊ देत नाही. त्यावेळी मला खूप दुःख होतं. मला समजत नाही, माझ्या सारख्या वृद्धांना याचा फायदा होत नाही तर का त्यांनी या वृद्धाश्रमाचं उद्घाटन केलं. 

या संदर्भात आयएमइनच्या प्रतिनिधी नगरसेवक शुभांगी पाटील यांच्याशी बोलल्या, त्या म्हणाल्या. मी महापालिकेला पत्र पाठवलं आहे. त्यांनी वृद्धांना टीव्ही, खुर्च्या, टेबल, कॅरम आणि इतर सुविधा द्यायला हव्यात. पण अद्याप ते झाले नाही. तसेच वृद्धाश्रमाच्या चाव्याही दिलेल्या नाहीत. मला माहिती नाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कुठून चाव्या मिळाल्या आणि ते दररोज कसे वृद्धाश्रम उघडतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.