पतीच्या डोक्यात पाटा घालून पत्नी बसली शांत

पतीच्या डोक्यात दगडी पाटा घालून काही घडलेच नाही अशा आविर्भावात ती घराबाहेरील ओट्यावर शांत बसली. घरात पती रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. मात्र त्याचे तिला काहीही दु:ख नव्हते. अखेर गल्लीतील लोकांनीच पोलिसांना फोन करून त्याला घाटीत दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Updated: Jul 7, 2015, 07:04 PM IST
पतीच्या डोक्यात पाटा घालून पत्नी बसली शांत title=

औरंगाबाद : पतीच्या डोक्यात दगडी पाटा घालून काही घडलेच नाही अशा आविर्भावात ती घराबाहेरील ओट्यावर शांत बसली. घरात पती रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. मात्र त्याचे तिला काहीही दु:ख नव्हते. अखेर गल्लीतील लोकांनीच पोलिसांना फोन करून त्याला घाटीत दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रमेश शंकर मोरे (४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी अनिता आणि तिचा मित्र शालूमन घोरपडे या दोघांच्या विरोधात रमेशचा भाऊ सुरेश मोरे यांनी तक्रार दिली असून दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुकुंदवाडी येथील संतोषी माता नगरातील गल्ली नंबर येथे हा प्रकार घडला. दोन वर्षांपासून रमेश आणि अनिता यांच्यात वाद होता. त्यामुळे रमेश वेगळा राहत होता. १५ वर्षांचा एक मुलगा आणि त्यापेक्षा मोठी मुलगी असे त्यांचे कुटुंब होते. 

शालूमन घोरपडे (रा. प्रकाशनगर) या टँकरचालकाशी अनिताची मैत्री होती. त्याचे घरी येणे-जाणे असल्याने हे रमेशला खटकत होते. सोमवारी शालूमन घरी आल्याचे कळताच रमेश घरी गेला. तेव्हा तिघांचे भांडण झाले. शालूमन याने रमेशच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला तरीही तो भांडतच होता. शेवटी अनिता हिने जवळच पडलेला मसाला वाटण्याचा पाटा रमेशच्या डोक्यात घातला आणि रमेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. दरम्यान तिचा मित्र शालूमन फरार झाला तर काही झालेच नाही अशा आविर्भावात अनिता ओट्यावर येऊन बसली, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

कॅमेऱ्यात वाद झाला कैद
हा वाद गल्लीतील एका छोट्या मुलाने मोबाइलमध्ये चित्रित केला आहे. सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौघुले यांनी चित्रीकरण ताब्यात घेतले. रमेश यानेच शालूमन घोरपडेची अनिता हिच्याशी ओळख करून दिली होती. दोघे एकाच पाण्याच्या टँकरवर काम करत होते. घटनेनंतर पोलिसांनी अनिताला अटक केली. शालूमन पसार झाला आहे, असे पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.