'व्हॉटस्अप' बनलं देवदूत!

‘व्हॉटस् अप’ म्हणजे टाईमपास... असाच आपला समज... मात्र, याच व्हॉट्सपअचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय...

Updated: Nov 18, 2014, 10:55 AM IST
'व्हॉटस्अप' बनलं देवदूत!   title=

मुंबई : ‘व्हॉटस् अप’ म्हणजे टाईमपास... असाच आपला समज... मात्र, याच व्हॉट्सपअचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय...

पिंपरी चिंचवडच्या ए. डी. कांबळे हे आज नवा दिवस पाहू शकतायत त्याचं कारण आहे... व्हॉटसअप... कांबळे गेले काही दिवस पिंपरी चिंचवडच्या वाय. सी. एम. रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत होते. त्यांना ‘डायलॅसिस’ची गरज होती. मात्र, त्यासाठी त्यांना दुर्मिळ ‘एबी निगेटिव्ह’ रक्तगटाची आवश्यकता होती. 

सर्व रक्तपेढ्या ढुंडाळूनही रक्त मिळेना तेव्हा अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी व्हॉटस अपवर रक्तगट आणि संपर्कसाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक पाठविला. हा संदेश त्यांच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचला आणि तिथून तो अनेक लोकांबरोबर शेअर करण्यात आला... आणि अखेर ‘व्हॉट्सअप’च्या सहाय्यानं अखेर त्यांना जिवदान देणारी व्यक्ती सापडलीच.

भानुदास नखाते यांनी हा मॅसेज मिळाल्यानंतर तात्काळ दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला... आपल्यामुळे एक जीव वाचल्यानं भानुदासही समाधानी आहेत...

‘व्हॉटस्अप’चा वापर बहुतांश वेळा मनोरंजनासाठीच होतो… मात्र, याच व्हॉट्सपनं एकाचा जीव वाचवलाय.. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यापेक्षा वेगळा तो कसा असू शकेल… 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.