महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेवरून वाद

कोल्हापुरात श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनीक प्रक्रिया करण्यावरुन वाद निर्माण झालाय. उद्यापासून महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर प्रत्यक्षात रासायनिक प्रक्रिया होणार आहे.

Updated: Jul 23, 2015, 09:31 PM IST
महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेवरून वाद  title=

कोल्हापूर : कोल्हापुरात श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनीक प्रक्रिया करण्यावरुन वाद निर्माण झालाय. उद्यापासून महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर प्रत्यक्षात रासायनिक प्रक्रिया होणार आहे.

मात्र हिंदू जनजागृती समितीनं या रासायनिक प्रक्रियेला विरोध केल्यामुळं  रासायनिक प्रक्रिया वादात सापडलीय.

तर दुसरीकडं श्री महालक्ष्मी मूर्तीच्या रासायनिक प्रक्रियेतील अडथळे दूर होण्याची शक्यता निर्माण झालीय. केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्यातील पुरातत्व विभाग यांच्यात यासंदर्भातली बोलणी सुरू झालीयत... याबाबत पुरातत्व विभाग काय निर्णय घेतं, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय...

दरम्यान, कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या रासायनिक प्रक्रियेला करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर नृसिंह भारती यांनी मात्र पाठिंबा दिलाय

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.