नाशिक : साधूग्राममधील मोक्याच्या जागा पटकावण्याच्या वादातून साधूमहंतांच्या आखाड्यांमध्येच 'आखाडा' रंगू लागला आहे. निर्वाणी आणि दिगंबर आखाड्यातील वाद अधिकच चिघळल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांनी बुधवारी आखाडा परिषदेवरील पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला.
आखाड्यांना जागा वाटप करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने बैठक बोलावली होती. परंतु, बैठकीत चर्चाच केली नाही. आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास यांनी जागा वाटपासंदर्भात तीनही आखाडे आणि त्यांच्या अंतर्गत अन्य आखाड्यांची बैठक बोलावली होती.
२००३ नुसार आताही जागा वाटप करण्याचे सूत्र ठेवण्यात आले. मात्र, मोक्याच्या जागेवर कुणी थांबायचे व मागे कुणी जायचे यावरून वाद निर्माण झाले आहेत. निर्वाणी आणि दिगंबर अशा दोन्ही आखाड्यांनी साधूग्राममधील मोक्याच्या जागांवर हक्क सांगितल्याने वादाला तोंड फुटले.
छोट्या गोष्टींवरून हट्टाला पेटणाऱ्या साधूंना साधूग्राममधील जागेचे वाटप करणे डोकेदुखी असल्याचे प्रशासनातील अधिकारी जाणून होते. म्हणूनच आखाड्यांनी स्वत:च आपापसात चर्चा करून जागावाटपाचा निर्णय घ्यावा, असे म्हणत प्रशासनाने या प्रक्रियेमधून अंग काढून घेतले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.