डोंबिवली: सांस्कृतिक शहर डोंबिवलीचं नाव आता गिनीज बुकात नोंदलं गेलंय. ११० दिवस मेहेनत करून जिगसॉ पझल तयार करण्यात आलंय. जगातलं हे सर्वात मोठं जिगसॉ पझल आहे. डोंबिवलीतल्या बंदिस्त क्रीडासंकुलात हे अनोखं भव्य पझल प्रेक्षकांसाठी पाहायला खुलं आहे.
डोंबिवली टुगेदर.. डोंबिवलीतलंच नव्हे तर जगातलं सर्वात मोठं जिगसॉ पझलचं नाव आता गिनीज बुकातही नोंदलं गेलंय. डोंबिवलीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेलाय. डोंबिवलीतल्या रोटरी क्लबच्या तीनशे कार्यकर्त्यांनी ११० तास रात्रंदिवस मेहनत करून हे जिगसॉ पझल म्हणजेच चित्रांचं कोडं रचलं. जवळपास १० लाख ४० हजार ४८४ तुकडे वापरून तब्बल ७ हजार ७०० चौरस फुटांचं पझल तयार कऱण्यात आलं.
गिनीज बुकात नोंद झाल्यावर आता डोंबिवली टुगेदर नावानं हे पझल सर्वसामान्यांना पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनाला डोंबिवलीकरांनीही तुफान प्रतिसाद दिलाय. हा एक आगळावेगळा रेकॉर्ड डोंबिवलीकरांनी करून सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.