वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

 नवी मुंबईत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची बाब उघड झाली आहे. गरीब घरातील मुलींना हेरुन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.

Updated: Oct 10, 2015, 04:34 PM IST
वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार title=

नवी मुंबई : नवी मुंबईत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची बाब उघड झाली आहे. गरीब घरातील मुलींना हेरुन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.

लहान मुलींना वडापाव आणि इडलीचे लालूच दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४८ वर्षीय मॅथ्यू नाडर याला नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. गरीब घरातील अल्पवयीन मुलींना हेरुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

कळंबोली येथे राहणाऱ्या मॅथ्यू नाडर याचा वडापाव आणि इडलीचा व्यवसाय आहे. तो गेल्या १० वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. व्यवसायच्या ठिकाणी अल्पवयीन मुलींना हेरुन वडापाव आणि इडली खायला तो देत असे. त्यानंतर तो त्यांचे लैंगिक शोषण करी. 

माथाडी वसाहतीत त्याचे दुकान असून, तो गरीब घरातील या मुली हेरायचा. याबाबत कोणी तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. याबाबत नवी मुंबई गुन्हे शाखेला खबर मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर पाळत पोलिसांनी ठेवली. पोलिसांना सातवी आणि आठवीत शिकणाऱ्या दोन मुलींबरोबर त्याने गैरवर्तन केल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी नाडर याला अटक केली. त्याच्यावर बाललैंगिक शोषण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.