उदयनराजे भोसले यांचे चिरंजीव वीरप्रतापराजे एव्हरेस्टवर

सातारा म्हटलं की उदयनराजे भोसले हे समीकरण आलं. त्यांच्याच चिरंजिवाने एक धाडस केलं आहे. या धाडसाचे कौतुक होत आहे. आपल्या आईसोबत त्यांने एव्हरेस्टव बेस कॅम्पपर्यंत धडक मारली.

Updated: Nov 16, 2016, 08:06 PM IST
उदयनराजे भोसले यांचे चिरंजीव वीरप्रतापराजे एव्हरेस्टवर title=

सातारा : सातारा म्हटलं की उदयनराजे भोसले हे समीकरण आलं. त्यांच्याच चिरंजिवाने एक धाडस केलं आहे. या धाडसाचे कौतुक होत आहे. आपल्या आईसोबत त्यांने एव्हरेस्टव बेस कॅम्पपर्यंत धडक मारली.

प्रत्येक आई आपल्या मुलाना त्याच्या भविष्यतील आव्हानासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असते. वेगवेगळ्या पद्धतीने  लहानपणापासून प्रत्येक आई मुलांना धडे देताना आपण पाहतो.  अवघ्या ११ वर्षांत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे पूत्र वीरप्रतापराजे यांना देखील त्यांच्या आई सौ. दमयंतीराजे भोसले धडे देताना दिसत आहेत.

वीरप्रतापराजे यांनी आपल्या आईच्या  मदतीने जगातील सर्वात उंच शिखर पर्वत असलेल्या एव्हरेस्ट पर्वताच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्याचा विक्रम करून दाखवला आहे. सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या साथीने एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत अवघ्या ११ वर्षांत धडक मारून एक वेगळाच संदेश दिला आहे. 

२६ ऑक्टोबरला नेपाळ-काठमांडू येथीलच्या कुंभूव्हॅली येथून या कॅम्पची सुरुवात झाली. ९ दिवसांच्या या कॅम्पमध्ये अनेक अडचणी आल्या. मात्र सौ. दमयंतीराजे आणि वीरप्रतापराजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला आहे. या प्रवासा दरम्यान गोरकशिप येथे सर्वात उंचीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.