चोरी केल्याबद्दल चोराची पत्राने माफी

एखाद्या चोरानं चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटलंय, असं कधी तुम्ही ऐकलय का ? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असणार.. पण असं घडलय कोल्हापूर शहरात. 

Updated: Nov 16, 2016, 07:06 PM IST
चोरी केल्याबद्दल चोराची पत्राने माफी title=

कोल्हापूर : एखाद्या चोरानं चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटलंय, असं कधी तुम्ही ऐकलय का ? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असणार.. पण असं घडलय कोल्हापूर शहरात. 

कोल्हापूरातील जिल्हा पशु संवर्धन विभागात चोरट्यानं कॉम्पुटर आणि इतर वस्तुची चोरी केली आणि त्यानंतर त्याने चक्क चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटल्याचं पत्र ऑफीसमध्ये ठेवलंय. 

या अनोख्या चोरीबद्दल संध्या कोल्हापूराकराच्यात उलट सुलट चर्चा सुरु आहे.कोल्हापूर पोलीसांना अद्याप या चोरट्याला पकडण्यात यश आलेलं नाही.