संजय पाटील हत्या प्रकरणी विलासकाका उंडाळकरांचा मुलगा निर्दोष

महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणी आमदार विलासकाका उंडाळकरांचे पूत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेली २० महिने उदयसिंह हत्येच्या आरोपाखाली तुरूंगात होते. 

Updated: Oct 18, 2014, 01:34 PM IST
संजय पाटील हत्या प्रकरणी विलासकाका उंडाळकरांचा मुलगा निर्दोष title=

कराड: महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणी आमदार विलासकाका उंडाळकरांचे पूत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेली २० महिने उदयसिंह हत्येच्या आरोपाखाली तुरूंगात होते. 

१५ जानेवारी २००९ रोजी संजय पाटील यांची कराडमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी उदयसिंह यांच्यासह ९ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, सागर परमार आणि हमीद शेख यांना जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.

याप्रकरणी एकूण १२ जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयानं या खटल्यातू १० जणांची निर्दोष सुटका केली असून दोघांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाच्या या निकालामुळं विलासकाका उंडाळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.