मुंबई : प्रिय नेटीझन्स लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही तुम्हांला जलद आणि अचूक निकाल दिला होता. त्यावेळी तुमच्या प्रेमामुळे आणि आमच्यावरील विश्वासामुळे झी २४ तासची वेबसाइट 24taas.com ला नंबर १ बनविले होते.
यंदाही तुमच्या अपेक्षांना खरं उतरण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. १९ तारखेला अपटेड निकाल देण्यासाठी आमची संपूर्ण टीम सज्ज आहे. तुम्हांला २८८ मतदारसंघाचे सविस्तर निकाल आम्ही एका क्लिकवर देणार आहोत.
तर कशी असेल आमची साइट निकालाच्या दिवशी याची एक झलक तुम्हांला दाखवत आहोत. यामुळे तुम्हांला झटपट निकाल तुमच्या मोबाईलवर तसेच तुमच्या डेस्कटॉपवर दिसणार आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून एकाच वेळी विभागानुसार कोण आघाडीवर आहे, कोण विजयी झाले हे पाहता येणार आहे. त्यामुळे अशाप्रकारे निकाल देणारी पहिली साईट तुम्हांला पाहता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.