जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून २ ठार

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अंगावर वीज पडून शेतकऱ्यासह केळी मजुराचा मृत्यु झाला.

Updated: Oct 3, 2016, 12:12 AM IST
 जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून २ ठार title=

जळगाव  : जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अंगावर वीज पडून शेतकऱ्यासह केळी मजुराचा मृत्यु झाला.

अनवर्दे गावात दिलीप बाजीराव धनगर वय ५५ या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना तर येथे बबलू उलाल्या पावरा या ३२ वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यु झाला. 

तर अडावद गावात मनसिराम बारेला हा ३५ वर्षीय तरुण वीज पडून जखमी झाल्याची घटना घडली. जळगाव जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस झाला.