पालघर : पालघर जिल्ह्यातल्या केळवे रोडमधल्या बंधाऱ्यात पडून, एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अक्षय पाटील असं या तरुणाचं नाव आहे. सकाळी आपल्या मित्रांसोबत बंधाऱ्यावर सहलीसाठी गेला होता. दुपारी अक्षय पाण्यात पोहायला उतरला. मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
संध्याकाळी उशीरापर्यंत शोध घेऊनही त्याचा मृतदेह सापडला नव्हता. तर दुसरीकडे अर्नाळा इथं समुद्रात बुडून एकाचा मृत्यू झालाय. अल्पेश पालव असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.