लोणावळा : वीकेंडला एन्जॉय करण्यासाठी भुशी डॅमवर आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झालाय.. गेल्या 24 तासांत पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर आणि ठाण्यातल्या या दोघांचा बुडून मृत्यू झालाय..
भूशी डॅम ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथं येणा-या पर्यटकांची संख्या वाढलीय.. पर्यटकांची मुजोरी आणि अतिउत्साहीपणा हाच येथील अपघातांना कारणीभूत असल्याचे स्थानिकांनी म्हटलंय..
पोलिसांनीही या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन पर्यटन काळात केवळ ट्रॅफिक पुरता मर्यादीत पोलीस बंदोबस्त न ठेवता आजूबाजूला नजर ठेवावी... तसंच स्त्यावर, पर्यटन स्थळांवर नशाबाजी, हुल्लडबाजी करणाऱयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होतेय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.