एक्स्प्रेस हायवेवर एकाच दिवशी दोन अपघात

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज अपघातवार ठरला आहे. दुपारी झालेल्या कारच्या टक्करीनंतर आता खंडाळा एक्झीटजवळ एक कंटेनर उलटला आहे.

Updated: Jun 12, 2016, 07:26 PM IST
एक्स्प्रेस हायवेवर एकाच दिवशी दोन अपघात title=

पुणे : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज अपघातवार ठरला आहे. दुपारी झालेल्या कारच्या टक्करीनंतर आता खंडाळा एक्झीटजवळ एक कंटेनर उलटला आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर तुफान ट्रॅफिक जॅम झाला आहे. 

पुण्याकडे जाणाऱ्या दोन लेन बंद आहेत. तर पुण्याहून मुंबईकडे येणारी एक लेन बंद आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झालीय. रविवार असल्यामुळे एक्स्प्रेसवर वाहनांची गर्दी आहे. त्यातच आता कंटेनर उलटल्यामुळे तुफान ट्रॅफीक जॅम झाला आहे.

याआधी सकाळी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला. तीन कार एकमेकांना धडकल्या. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या या कार एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 1 जण ठार, तर 11 जखमी झालेत. या जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.