नाल्यात विषारी रसायन टाकल्यानं 100 जणांना विषबाधा

उल्हासनगरमध्ये १००हून अधिक जणांना विषबाधा झालीय. आज सकाळी उल्हासनगरमधील वालधूनी नाल्यात केमिकल सोडल्यानं विषारी वायू निर्माण झाला आणि यामुळं यापरिसरात राहणाऱ्या स्थानिकांना विषबाधा झाली.

Updated: Nov 29, 2014, 12:22 PM IST
नाल्यात विषारी रसायन टाकल्यानं 100 जणांना विषबाधा  title=

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये १००हून अधिक जणांना विषबाधा झालीय. आज सकाळी उल्हासनगरमधील वालधूनी नाल्यात केमिकल सोडल्यानं विषारी वायू निर्माण झाला आणि यामुळं यापरिसरात राहणाऱ्या स्थानिकांना विषबाधा झाली.

नागरिकांना उलटी, मळमळ, डोळे चुरचुरणे, श्वास गुदमरणे असा त्रास होऊ लागला. या सर्वांना तातडीनं सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

उल्हासनगरमधील सम्राट अशोकनगर, रेणूरकानगर, वडोल गाव, गुरुदास टॉवर आणि स्टेशनरोड परिसरातील नागरीकांना या विषारी वायुची लागण झालीये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.