अमरावती : शिवसेना ही आमच्या सरकारच्या सत्तेत सहभागी होणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली आहे. मात्र, याबाबत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे दोन नेते दिल्लीतून मुंबईत धाडण्यात आले आहेत. त्यांनी थेट मातोश्री गाठली. तेथे दरवाज्याआड चर्चा झाली. ही चर्चा मीडियापर्यंत पोहोचली नाही. त्यानंतर पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले. सुभाष देसाई आणि अनंत गिते हे शिवसेनेकडून चर्चा करण्यासाठी सह्याद्रीवर गेलेत. त्यामुळे चर्चा अजून सुरूच असल्याचे दिसत आहे.
ही चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावतीत शिवसेनेच्या सत्ता सहभागी घोषणा केली. त्यामुळे भाजप-शिवसेना यांचे सूत जमल्यात जमा आहे. त्याचवेळी भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष होईल. त्यासाठी प्रत्येकांनी काम केले पाहिजे. पक्षाची ताकत वाढविली पाहिजे, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.