वन विभागाची कासव संवर्धन मोहिम

निसर्मगाचा समतोल राखणारी ऑलीव्ह रेडली समुद्री कासवांची जात नामशेष होऊ नये, यासाठी रत्नागिरीत वन विभागानं कासव संवर्धन मोहिम हाती घेतलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 6, 2017, 11:05 PM IST
वन विभागाची कासव संवर्धन मोहिम  title=

रत्नागिरी : निसर्मगाचा समतोल राखणारी ऑलीव्ह रेडली समुद्री कासवांची जात नामशेष होऊ नये, यासाठी रत्नागिरीत वन विभागानं कासव संवर्धन मोहिम हाती घेतलीय. जिल्ह्यातील कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत कसवांची अंडी संवर्धित करण्यात आलीत. दापोली तालुक्यातील 9 गावातील 65 घरट्यात सुमारे 7 हजार अंडी आढळलीत. 

ही अंडी विविध कासव संवर्धन केंद्रात ठेवण्यात आलीयत. आतापर्यंत घरट्यातील 600 पिल्लं समुद्रात सोडली असून दाभोळ कासव संवर्धन केंद्रातील 40 पिल्ल वन विभागानं समुद्रात सोडली. कोकणातील समुद्र किना-यावर ऑलीव्ह रेडली जातीचे समुद्री कासव आढळून येतात. मात्र, अलीकडे समुद्री किनारपट्टीवर कासवांच्या अंडीची तस्करी होऊन चक्क ही जात नष्ट होईल की, काय अशी भीती व्यक्त केली जात होती.