सूर्य ओकतोय आग! अवघा महाराष्ट्र तापला, नागपूर@47

मे महिन्याच्या मध्यावर सूर्य अक्षरशः आग ओकू लागलाय. नागपूरमध्ये या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. आजचं नागपूरचं कमाल तापमान नोंदवलं गेलंय 47 अंश सेल्सिअस. काल म्हणजे मंगळवारी नागपूरचा पारा 46.9 अंश सेल्सिअसवर पोचला होता. 

Updated: May 20, 2015, 07:21 PM IST
सूर्य ओकतोय आग! अवघा महाराष्ट्र तापला, नागपूर@47 title=

नागपूर: मे महिन्याच्या मध्यावर सूर्य अक्षरशः आग ओकू लागलाय. नागपूरमध्ये या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. आजचं नागपूरचं कमाल तापमान नोंदवलं गेलंय 47 अंश सेल्सिअस. काल म्हणजे मंगळवारी नागपूरचा पारा 46.9 अंश सेल्सिअसवर पोचला होता. 

पुढचे काही दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राला कडक उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून मे हिट चा जबरदस्त तडाखा नागरिकांना बसतोय, कामानिमित्त बाहेर पडणे अनिवार्य असल्यानं उष्म्याची झळ नागरिकांना सोसावी लागतेय. वाढत्या उन्हामुळं तापाच्या रुग्णांतही वाढ झालीय.

नागपूरसोबतच बुलडाण्यात 46 डिग्री, चंद्रपुरमध्ये 47.4 डिग्री तर वर्धा इथं 47.2 डिग्री अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हामुळं दुपारात घरातून बाहेर पडणं अवघड झाल्याचं नागपूरमधील रहिवाशांनी सांगितलं. काही भागांमध्ये आता पाणीटंचाईची समस्याही निर्माण झाली आहे. 

राज्यातील आजचं तापमान-
मुंबई - 35.6 डिग्री 
सांताक्रुझ - 34.3 डिग्री
अलिबाग - 35.2 डिग्री
रत्नागिरी - 34.2 डिग्री
पणजी (गोवा) - 34.3 डिग्री
डहाणू - 35.7 डिग्री
पुणे - 36.2 डिग्री
अहमदनगर - जळगाव - 43.2 डिग्री
कोल्हापूर - 33.7 डिग्री
महाबळेश्वर - 29.4 डिग्री
मालेगाव - 44.8 डिग्री
नाशिक - 37.7 डिग्री
सांगली - 35.3 डिग्री
सातारा - 37.1 डिग्री
सोलापूर - 43.7 डिग्री
उस्मानाबाद - 43.1 डिग्री
औरंगाबाद - 43.8 डिग्री
परभणी - 45.5 डिग्री
नांदेड - 43.2 डिग्री
बीड - अकोला - 46.4 डिग्री
अमरावती - 45.6 डिग्री
ब्रह्मपुरी - 45.8 डिग्री
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.