नांदेड येथे तिरुपती एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरुन घसरले

तिरुपती एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरुन घसरलं. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड जंक्शन स्टेशनपासून जवळ असलेल्या शिवणगांव रेल्वे सिग्नल जवळ ही घटना घडली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 10, 2017, 07:56 AM IST
नांदेड येथे तिरुपती एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरुन घसरले title=

नांदेड : तिरुपती एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरुन घसरलं. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड जंक्शन स्टेशनपासून जवळ असलेल्या शिवणगांव रेल्वे सिग्नल जवळ ही घटना घडली. 

एक दुचाकीस्वार रेल्वे रुळ पार करत होता. तेवढ्यात तिरुपती एक्सप्रेस समोरुन येताना दिसली. ट्रेन येताना पाहताच दुचाकीस्वारानं उडी टाकली पण त्याची बाईक ट्रेनच्या इंजिनाखाली आली. त्यामुळे इंजिन रुळांवरुन घसरलं.

पण इंजिनानंतरचा एकही डबा रुळांवरुन घसरला नाही, त्यामुळे मोठी हानी टळली. पण या घटनेमुळे रात्री उशीरापर्यंत हैदराबादकडून नांदेड मार्गे होणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.