चंद्रपुरातील शिवनी जंगलात वाघाचा धुमाकूळ

सिंदेवाहीमध्ये शिवनी जंगलात एका वाघानं धुमाकूळ घातला आहे.  गेल्या 20 दिवसांपासून या वाघानं या परिसरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांत हल्लेखोर वाघाची ओळख पटवून त्याला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागानं मोहीम उघडली आहे.

Updated: Jan 28, 2017, 11:07 AM IST
चंद्रपुरातील शिवनी जंगलात वाघाचा धुमाकूळ title=

चंद्रपूर : सिंदेवाहीमध्ये शिवनी जंगलात एका वाघानं धुमाकूळ घातला आहे.  गेल्या 20 दिवसांपासून या वाघानं या परिसरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांत हल्लेखोर वाघाची ओळख पटवून त्याला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागानं मोहीम उघडली आहे.

आज सकाळी सिंदेवाही पासून 4 किमी अंतरावरच्या आंबोली जंगलात टेकडी भागामध्ये वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरूयत. वनविभागाचे तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी अभियानात सहभागी झालेयत. या वाघाच्या हल्ल्यात तीन महिलाही ठार झाल्य़ा होत्या. त्यामुळं परिसरातल्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.