पतंगाचा मांजा विजेच्या तारांत अडकला आणि...

पिंपरी चिंचवडमध्ये पतंग उडवत असताना मांजा विजेच्या तारेत अडकल्याने तीन चिमुकले जखमी झाल्याची घटना घडलीय. 

Updated: Jan 25, 2017, 12:50 PM IST
पतंगाचा मांजा विजेच्या तारांत अडकला आणि...  title=

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये पतंग उडवत असताना मांजा विजेच्या तारेत अडकल्याने तीन चिमुकले जखमी झाल्याची घटना घडलीय. 

पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील पडवळ नगरमध्ये पतंग उडवत असताना पतंगचा मांजा हायटेन्शन वायरमध्ये अडकून दोन मूलं किरकोळ जखमी झाले आहेत...7 वर्षीय आर्यन पांडे आणि अभिनंदन पांडे आणि त्यांचा मित्र आकाश प्रजापती या तीन चिमुरड्यांना जोरदाहर शॉक लागलाय. 

10 वर्षीय आकाश प्रजापती हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. आकाशला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही घटना आज दुपारी 11 वाजल्याच्या सुमारास घडली.