विदर्भ एक्स्प्रेसला उडवून देण्याची धमकी

विदर्भ एक्स्प्रेला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत सम्पूर्ण यंत्रणा खड़बडून जागी झालीय. 

Updated: Jan 27, 2016, 09:39 AM IST
विदर्भ एक्स्प्रेसला उडवून देण्याची धमकी title=

मुंबई / नाशिक : विदर्भ एक्स्प्रेला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत सम्पूर्ण यंत्रणा खड़बडून जागी झालीय. 

मुंबईपासून नाशिक रोड रेल्वे स्टेशनला येईपर्यंत चार वेळा गाड़ीची तपासणी करण्यात आल्याने गाडीत असलेल्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. कल्याणहून मुंबई लोहमार्ग पोलिसांना नीनावी फोन आला होता, त्यानंतर सीएसटी, दादर, इगतपुरी, नाशिकरोड या ठिकाणी गाडीची तपासणी करण्यात आली. 

नाशिकरोड रेल्वे स्थानकत, बॉम्ब शोधक, श्वान पथक, आरपीएफ, लोहमार्ग आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने सुमारे एक तास विदर्भ एक्प्रेसची कसून तपासणी केल्या नंतर गाड़ीत संशयित काहीच आढळून न आल्याने गाड़ी पुढच्या प्रवसाला मार्गस्थ झाली.