जेट्रोफा वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने २४ विद्यार्थ्यांना विषबाधा

जेट्रोफा म्हणजेच चंद्रज्योती या वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने २४ शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मांगकिन्ही येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. 

Updated: Dec 15, 2016, 04:03 PM IST
जेट्रोफा वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने २४ विद्यार्थ्यांना विषबाधा title=

यवतमाळ : जेट्रोफा म्हणजेच चंद्रज्योती या वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने २४ शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मांगकिन्ही येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. 

मांगकिन्ही येथे विद्यार्थ्यांनी चंद्रज्योती या वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने २४ विद्यार्थिनींना विषबाधा झाली. दरम्यान गावकऱ्यांनी त्यांना घेवून प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने सर्व चोवीसही विद्यार्थ्यांना प्रथम दारव्हा, त्यानंतर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

मांगकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने कुठलिही आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. याबाबबत गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.