नागपूर : नागपूरमध्ये टपाल विभागाचं विदर्भातलं पहिलं आणि राज्यातलं दुसरं एटीएम सेंटर उद्घाटन करण्यात आलंय.
भारतीय टपाल विभागात २०१२ पासून बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे टपाल विभागानं देशभरात एटीएम सेंटर सुरु केलसं. २०१४ मध्ये देशातील टपाल विभागाचे पहिले एटीएम सुरु झाले होते. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईतही टपाल विभागाचे एटीएम सेंटर सुरु झाले.
दरम्यान नागपूरमधल्या या एटीएम सेंटरचा वापर टपाल विभागाचे ग्राहकच करू शकत असले तरी ते लवकरच सर्वांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. येत्या दोन आठवड्यात महाराष्ट्रात पाच ते दहा एटीएम सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली गेली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.