औरंगाबाद : झटपट श्रीमंतीची स्वप्न पाहण्याच्या नादात मार्ग चुकला आणि थेट पोलीस स्टेशनचमध्ये रवानगी. झटपट श्रीमंत होण्यासाठी एका डॉक्टरला धमकावून खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
जालना रस्त्यावरील डॉक्टर अनुप टाकळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बंदुकीचा धाक दाखवत या आरोपींना २५ लाखांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी नागेश्वर चव्हाण आणि अर्जुन मोरे यांना या प्रकरणात अटक केली. त्यातील दोन्ही आरोपींना अटक झाल्यानंतर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हे घडल्याचं स्पष्ट झाले आहे.
या प्रकऱणातील बंदुकीचा धाक दाखवणारा तिसरा आरोपी मात्र अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र झटपट श्रीमंत होण्याचा या नादात या आरोपींना मात्र आता पोलीस ठाण्याची हवा खाण्याची वेळ आली आहे.