ठाणे : पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलीस कुटुंबीयांनी कँडल मार्च काढला. मेणबत्त्या पेटवत अपप्रवृत्तीचा निषेध नोंदवण्यात आला.
सरकारनं आता तरी जागं होऊन पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.. यावेळी तोंडाला काळ्या फिती लावून पोलीसांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला.