'सेल्फी'च्या मोहापायी विद्यार्थ्यानं गमावला जीव

'सेल्फी' काढताना तोल जाऊन मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कोसळल्यानं एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागलाय. 

Updated: Jun 22, 2016, 07:19 PM IST
'सेल्फी'च्या मोहापायी विद्यार्थ्यानं गमावला जीव title=

पुणे : 'सेल्फी' काढताना तोल जाऊन मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कोसळल्यानं एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागलाय. 

तनवेल कदम असं या २० वर्षीय तरुणाचं नाव आहे. सिंहगड कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला तनवेल शिकत होता. 

फिरण्यासाठी म्हणून आलेला तनवेल खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ थांबला... आणि इथं त्याला 'सेल्फी' काढण्याचा मोह आवरला नाही. 

सेल्फी काढता काढताच तनवेलचा तोल गेला आणि तो मागच्या बाजुला असलेल्या ५० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात तनवेलचा मृत्यू झालाय.