पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीत मतदान करुन त्याचा सेल्फी पाठवल्यास मालमत्ता करातून 25 टक्के सूट मिळणार आहे.
पनवेल महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी हे सेल्फी अभियान सुरु केलं आहे. त्यासाठी पालिकेनं एक व्हॉट्स ऍप नंबरही प्रसिद्ध केलाय. या नंबरवर नागरिकांना आपला सेल्फी पाठवता येईल.
मतदारांमध्ये जनजागृती करणं आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आलाय. येत्या 24 मे रोजी हे मतदान होतं आहे.
उन्हाळ्यात ही निवडणूक आल्याने त्याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर बसू नये यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आलाय. कुटुंबाचा मतदान केल्याचा सेल्फी पाठवल्यास प्रत्येक प्रभागात पाच अशाप्रकारे शंभर जणांना ही सूट देण्यात येणार आहे.