नाशिकमध्ये चलनाअभावी बहुतेक एटीएम बंद

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातल्या बहुतांशी एटीएममध्ये पैसेच नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 17, 2017, 10:40 AM IST
नाशिकमध्ये चलनाअभावी बहुतेक एटीएम बंद title=

नाशिक : बहुतांशी एटीएम बंद आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातल्या बहुतांशी एटीएममध्ये पैसेच नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. 

जे एटीएम सुरु आहे त्यात थोडेफार पैसे शिल्लक आहेत. नाशिकमध्ये आता तर एटीएम पाठोपाठ बँकांमध्येही चलन तुटवडा जाणवू लागला आहे. 

याच पार्श्वभूमीवर बँकांच्या व्यवहारासाठी शंभर कोटींची मागणी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये मागील काही दिवसापासून चलन तुटवडा जाणवत आहे, लोकांना बँकेत पैसा मिळतोय, पण यातही तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

आरबीआयकडून चलन पुरवण्यात आल्यास काही दिवसांनी चलन तुटवड्याचा विषय संपणार असल्याचं सांगण्यात येत आहे.