नागपूरनंतर अकोल्यात 'स्वाइन फ्लू'चे २ संशयित

नागपूर पाठोपाठ आता विदर्भातील इतरही शहरांमध्ये 'स्वाइन फ्लू'नं डोकं वर काढलंय. अकोल्यातील दोन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर तीन संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात भारती करण्यात आलंय.

Updated: Feb 15, 2015, 01:35 PM IST
नागपूरनंतर अकोल्यात 'स्वाइन फ्लू'चे २ संशयित title=

अकोला: नागपूर पाठोपाठ आता विदर्भातील इतरही शहरांमध्ये 'स्वाइन फ्लू'नं डोकं वर काढलंय. अकोल्यातील दोन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर तीन संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात भारती करण्यात आलंय.

मात्र, अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात स्वाइन फ्लूवर उपचार करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून गांभीर्यानं कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. सध्या रुग्णालयात केवळ दोन खोल्यांमध्ये १० खाटांची व्यवस्था करण्यात आलीये. त्यामुळं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.