शेतमजूर ते महापौर... पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा प्रवास

पिंपरी चिंचवडच्या नव्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांची स्वतःची एक सक्सेस स्टोरी आहे. शेतमजूर ते महापौर असा त्यांचा संघर्षमय प्रवास आहे.

Updated: Sep 15, 2014, 09:34 PM IST
शेतमजूर ते महापौर... पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा प्रवास  title=

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडच्या नव्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांची स्वतःची एक सक्सेस स्टोरी आहे. शेतमजूर ते महापौर असा त्यांचा संघर्षमय प्रवास आहे.

नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात १० वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या शकुंतला धऱ्हाडे यांच्या पतीला पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी लागली आणि शकुंतला धऱ्हाडे पिंपरी चिंचवडमध्ये राहायला आल्या. घरची परिस्थिती बेताची असल्यानं शकुंतला धऱ्हाडेंनी शेतमजूरीचं काम सुरु केलं. त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून वडापाव, इडली विकण्याचं काम त्यांनी सुरू केलं. 

बचत गटात काम करता करता अनेक महिलांशी, त्यांच्या कुटुंबीयांशी शकुंतला धऱ्हाडेंचा संपर्क वाढला. त्याचं हे काम राजकीय पक्षांच्या नजरेत भरलं आणि २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना महापालिकेसाठी उमेदवारी दिली. तीही त्यांच्या राहण्याच्या नव्हे तर शेजारच्या वॉर्डात… पहिल्याच वेळी शकुंतला धऱ्हाडे बिनविरोध निवडून आल्या… अर्थात त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात असलेली ताकदही कारणीभूत होती… २०१२ मध्येही पिंपळे गुरवमधून त्या बिनविरोध निवडून आल्या. 

महापालिकेचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं आणि अजित पवारांनी शकुंतला धऱ्हाडेंना थेट महापौरपदाची संधी दिली. शंकुतला धऱ्हाडे यांचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतमजूर ते महापौर हा प्रवास जितका संघर्षमय तितकाच प्रेरणादायक आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.