प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांची समाजातील दुर्लभ घटकांना मदत

प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक जण आपल्यापरिने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.

Updated: Jan 27, 2017, 03:59 PM IST
प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांची समाजातील दुर्लभ घटकांना मदत title=

ठाणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक जण आपल्यापरिने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम पाबवले जातात. पण IEIBS Akademia च्या विद्यार्थ्यांनी एक वेगळा उपक्रम या दिनानिमित्त राबवला. या विद्यार्थ्यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला भेट दिली आणि त्यांच्यासोबत काही वेळ घालवला.

हे विद्यार्थी समाजात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. याच विद्यार्थ्यांनी फुटपाथवर राहणाऱ्या समाजातील दुर्लभ आणि गरजूंना कपडे आणि जेवन दिलं. 

एड्स या भंयकर आजाराबाबत जागृती करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी याआधी स्लोगन आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली. यातून त्यांनी समाजामध्ये आणि तरुणांमध्ये जागृकता आणण्याचा प्रयत्न केला. असे अनेक उपक्रम हे विद्यार्थी राबवत असतात.