पुणे: या आठवड्यात कमी झालेला थंडीचा कडाका शनिवारी पुन्हा वाढला. काही शहरांचं किमान तापमान वेगानं घसरलं. नागपूरमध्ये सर्वांत कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविलं गेलं.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. तिथून बोचरे वारे राज्यात वेगानं वाहत असल्यानं पुन्हा पारा घसरू लागला आहे. नागपूरचं किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५.६ अंश सेल्सिअसनं कमी झालं होतं. विदर्भाचं तापमान आज सर्वांत जास्त घटलं होतं.
त्यापाठोपाठ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे तापमान घटले होते. पुढील ४८ तासांत राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तविली आहे.
पाहा कोणत्या जिल्ह्यात किती होतं किमान तापमान?
२.२,चंद्रपूर ११,
यवतमाळ १०.४.
जळगाव १०,
कोल्हापूर १५.४,
महाबळेश्वर १०.६,
मालेगाव ९,
सांगली १४.५,
सातारा १३.४,
सोलापूर १३,
मुंबई २१.६,
अलिबाग १७.६,
रत्नागिरी १८.९,
डहाणू १७.१,
उस्मानाबाद ९.९,
औरंगाबाद ११.४,
परभणी १०.२,
नांदेड १०,
अकोला ८.६,
अमरावती १
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.