बोअरवेलमध्ये पडलेला ४ वर्षांचा ऋतुराज सुखरूप बाहेर

औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातीलगोलवाडी इतं अवघ्या चार वर्षांचा एक मुलगा खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडलाय. ऋतुराज ढंगारे असं या चिमुरड्याचं नाव आहे.

Updated: Dec 26, 2014, 03:18 PM IST
बोअरवेलमध्ये पडलेला ४ वर्षांचा ऋतुराज सुखरूप बाहेर title=

औरंगाबाद : औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातीलगोलवाडी इतं अवघ्या चार वर्षांचा एक मुलगा खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय.  ऋतुराज ढंगारे असं या चिमुरड्याचं नाव आहे.


ऋतुराजला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

गावाबाहेर या बोअरवेलचं खोदकाम सुरु होतं. या बोअरवेलचं झाकणं उघडं असल्यानं खेळता खेळता ऋतुराज या बोअरवेलमध्ये पडला होता. बोअरवेलमध्ये जवळपास १५ फुटांवर चिमुकला ऋतुराज अडकून पडला होता. आज सकाळी साडे दहा वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेची माहिती समजताच तहसीलदार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ऋतुराजला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी थर्थीचे प्रयत्न सुरु झाले... आणि अखेर या प्रयत्नांना यश आलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.