मंबई : राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये असलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यमंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात एक प्रभाग आणि एक नगरसेवक हीच पद्धत असणार आहे.
महिला आरक्षणामुळे येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी एकाच प्रभागामध्ये दोन नगरसेवक निवडून देण्याची पद्धत काही वर्षांपूर्वी राबवण्यात आली होती. आताच्या भाजप-शिवसेना सरकारने ही पद्धत मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई नगरपालिका आणि नगरपंचायत कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. अधिवेशन संपताच या कायद्यामध्ये दुरुस्ती करणारा अध्यादेश जारी केला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.