ठाणे : अंबरनाथ लोकलमध्ये अॅसिडची बाटली फुटल्याने अॅसिड उडून पाच जण जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबरनाथ लोकलमध्ये मुलुंड-ठाणे दरम्यान अॅसिडची बाटली फुटली. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत.
या प्रकारामुळे लोकलमध्ये धावपळ उडाली. काय झाले हे पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. अॅसिडमुळे पाच जण भाजले. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मात्र, जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.