मनसे नगरसेविकेच्या गुंड नवऱ्याला अटक

पुण्यातला कुख्यात गुंडे गजा मारणे याला कामोठे पोलिसांनी अटक केलीय. पुणे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींनी अटक झालीय. 

Updated: Dec 11, 2014, 12:18 PM IST
मनसे नगरसेविकेच्या गुंड नवऱ्याला अटक title=

मुंबई : पुण्यातला कुख्यात गुंडे गजा मारणे याला कामोठे पोलिसांनी अटक केलीय. पुणे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींनी अटक झालीय. 

गजानन मारणे आणि रुपेश मारणे असं या आरोपींचं नाव असून कामोठेतील व्यंकट हॉटेलजवळ या दोघांना अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून दोन चॉपर्सही हस्तगत करण्यात आलेत. 
हे दोघेही राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत होते. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात अमोल बधे याची या दोघांनी हत्या केली होती.

गजा मारणे हा पुण्यातील नामचीन गुंड असून त्याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात तब्बल ११६ गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे गजा हा पुण्यातील एका मनसे नगरसेविकेचा नवरा आहे. एका बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादनेच त्याची गुंडगीरी बोकाळली असल्याची चर्चा आहे. 

गँगवॉर काही थांबेना... 
महत्त्वाचं म्हणजे, पुण्यातील गुंडगिरी चिरडून टाकण्याचे आदेश नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही शहरातील गँगवॉर थांबण्याची चिन्हं नाहीत. वैकुंठ स्मशानभूमीसमोरील गँगवॉरमध्ये घायवळ टोळीतील अमोल बधेच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच काल पिंपरी चिंचवड मध्ये प्रकाश चव्हाण या गुंडची हत्या झालीय. दरम्यान अमोल बढे खून प्रकरणात फरारी असलेल्या गजा मारणेला पोलिसांनी अटक केलीय, हीच तेवढी दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

मारणेला अटक झाली असली तरी पुण्यातील गुंडगीरीचा विषय संपलेला नाहीए. अशातच चक्क कोर्टाचा बनवत आदेश तयार करून खुनातल्या आरोपींनी जमीन मिळवल्याचा धक्कदायक प्रकारही काल समोर आलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.