राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं खातेवाटप जाहीर

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यानंतर आता या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

Updated: Jul 9, 2016, 10:51 PM IST
राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं खातेवाटप जाहीर  title=

 

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यानंतर आता या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. याआधी एकनाथ खडसेंकडे असलेलं महसूल खात आता चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे याआधी सार्वजनिक बांधकाम खातं आहे. हे खातं त्यांच्याकडे कायम असणार आहे, तर चंद्रकांत पाटील यांना सहकार मंत्री पदावरून मुक्त करण्यात आलं आहे. 

एकनाथ खडसेंकडे याआधी असलेलं कृषी खातं पांडुरंग फुंडकर यांना देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडचं जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेचं खातं काढून घेण्यात आलं आहे. राम शिंदे आता जलसंधारण मंत्री असतील. 

हे आहेत नवे मंत्री

चंद्रकांत पाटील- महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री 

पांडुरंग फुंडकर - कृषी मंत्री

राम शिंदे- जलसंधारण मंत्री 

सुभाष देशमुख- सहकार, पणन, वस्त्रोद्योग

संभाजी पाटील निलंगेकर- कामगार कल्याण मंत्री

गुलाबराव पाटील- सहकार राज्यमंत्री

महादेव जानकर- पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री

दीपक केसरकर- गृहराज्यमंत्री (ग्रामीण)

जयकुमार रावल- रोजगार हमी योजना, पर्यटन

गिरीश महाजन- वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा

चंद्रशेखर बावनकुळे- उर्जा, उत्पादन शुल्क

अर्जुन खोतकर- पशुदुग्ध राज्यमंत्री

रवींद्र चव्हाण- बंदरे आणि आरोग्य राज्यमंत्री

सदाभाऊ खोत- कृषी आणि पणन राज्यमंत्री