कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी विशेष गाडी

कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी  विशेष  गाडी सोडण्यात आली आहे. मडगाव ते एलटीटी आणि करमाळी ते एलटीटी अशा चार फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. 

Updated: Sep 27, 2014, 04:02 PM IST
कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी  विशेष  गाडी title=

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी  विशेष  गाडी सोडण्यात आली आहे. मडगाव ते एलटीटी आणि करमाळी ते एलटीटी अशा चार फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. 

करमाळी ते एलटीटी गाडी एसी डबल डेकर असणार असून, त्याचे भाडे साधारण दरात असेल. ५ ऑक्टोबर रोजी ००११२ ट्रेन मडगावहून संध्याकाळी ७ वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल.

००१११ ट्रेन एलटीटीहून सकाळी ९.०५ वाजता सुटून मडगावला रात्री ९.४0 वाजता पोहोचेल. या गाडीचे आरक्षण २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कुडाळ, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.