...म्हणून सेना नगरसेवकाला दूधानं अभिषेक घातला!

ही बातमी समजल्यानंतर तुमचा संताप होईल. कारण, सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पराभूत करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकाला चक्क दुधाचा अभिषेक घालण्यात आलाय.

Updated: Jun 17, 2015, 10:28 PM IST
...म्हणून सेना नगरसेवकाला दूधानं अभिषेक घातला! title=

सोलापूर : ही बातमी समजल्यानंतर तुमचा संताप होईल. कारण, सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पराभूत करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकाला चक्क दुधाचा अभिषेक घालण्यात आलाय.

सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १८ (ब) मधून शिवसनेचे उमेदवार महेश कोठे जिंकून आले. सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. 

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहाच्या भरात अनेक लीटर दूध वाया घालवलंय. एकीकडं दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी आंदोलन करतायत. दर दुसरीकडं विजयाच्या उन्मादात दुधाची अशी नासाडी केली जातेय.

विजयी उमेदवाराला अभिषेक घालून दुधाचा पाट रस्त्यावर सोडणाऱ्या या कार्यकर्त्यांना काय शिक्षा करायची, असा सवाल आता केला जातोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.