कुंभमेळ्यापूर्वीच 'कॉन्डोम्स'चा स्टॉक संपला, 'एचआयव्ही'ची धास्ती!

नाशिकमध्ये १४ जुलैपासून कुंभमेळा सुरू होतोय... पण, प्रशासन मात्र भलतंच धास्तावलंय. याचं कारण आहे नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच 'कॉन्डोम'चा स्टॉक संपत आलाय. नाशिकमध्ये केवळ ५० हजार कॉन्डम्स स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. अशा वेळी असुरक्षित सेक्समध्ये वाढ होऊन एडसचा धोका वाढल्याचं समोर येतंय. 

Updated: Jul 4, 2015, 03:50 PM IST
कुंभमेळ्यापूर्वीच 'कॉन्डोम्स'चा स्टॉक संपला, 'एचआयव्ही'ची धास्ती! title=

नाशिक : नाशिकमध्ये १४ जुलैपासून कुंभमेळा सुरू होतोय... पण, प्रशासन मात्र भलतंच धास्तावलंय. याचं कारण आहे नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच 'कॉन्डोम'चा स्टॉक संपत आलाय. नाशिकमध्ये केवळ ५० हजार कॉन्डम्स स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. अशा वेळी असुरक्षित सेक्समध्ये वाढ होऊन एडसचा धोका वाढल्याचं समोर येतंय. 

'महाराष्ट्र स्टेट एडस कंट्रोल सोसायटी'नं कॉन्डम्सच्या कमतरेतेविषयी तक्रार करत अधिक कॉन्डम्सचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केलीय. नाशिकमध्ये महिला सेक्स वर्कर्ससाठी केवळ ५० हजार कॉन्डम्स स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. हा स्टॉक तर कुंभमेळ्यापूर्वीच संपून जाईल, असं सोसायटीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.   

लाखो साधुसंतांसहित या धार्मिक कार्यक्रमात जवळपास एक करोड लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये २००० महिला सेक्स वर्कर्स, ५६० समलैंगिक आणि ७० ट्रान्सजेंडर आहेत. याशिवाय, शहरात जवळपास एक लाख लोक राहतात. अशा वेळी शहरात प्रत्येक महिन्याला दीड ते दोन लाख कॉन्डम्सची गरज पडते. अशा वेळी कुंभमेळा समोर असताना ही मागणी मोठ्या प्रमाणात गरज भासू शकते. नाशिकमध्ये तब्बल २४ लाख कॉन्डम्सची गरज आहे, या मागणीची पूर्तता झाली नाही तर एचआयव्हीचं संक्रमण रोखणं अशक्य होईल, असं काही प्रोडक्ट मॅनेजर्सचं म्हणणं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.